
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंग याच्या मुंबईतील ओशिवारा येथील घरात चोरी झाली असून चोरट्यांनी घरातील तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी मिकाने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
मिका सिंग याचे ओशिवारातील एनक्लेव्ह इमारतीत घर आहे. मिका सध्या कामानिमित्त मुंबई बाहेर आहे. सोमवारी दुपारी तीन ते चार दरम्यान मिकाच्या घरातून चोरट्यांनी दोन लाखाचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड चोरली आहे. पोलिसांना मिका सिंग याचा नोकर अंकित वसान याच्यावर संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
summary : Mika Singh robbed of Rs 3 lakh, police suspect his close aide




























































