सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आंदोलन हिंसक झाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

मराठा समाजाचे ५८ मोर्चे शांततेत काढण्यात आले. त्या मोर्चाची दखल सरकारने घेतली नाही. सरकारचा नाकर्तेपणा आणि लालफितीच्या कारभारामुळे चळवळीतील कार्यकर्त्यांना आक्रमक व्हावे लागले हे मागील आठवडाभरापासून राज्यात होत असलेल्या मराठा आंदोलनामधून दिसून येत आहे. हिंसक घटनेचे समर्थन करीत नाही. पण आंदोलकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरल्याने आंदोलानास हिंसक स्वरूप मिळाले आहे, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्तालापा प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील आणि सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.