सर्वाधिक वजनाचा इस्रोचा उपग्रह ३० नोव्हेंबरला प्रक्षेपित होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
gsat

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइजेशन म्हणजे इस्रोटा सर्वाधिक वजनाचा जी सॅट ११ हा उपग्रह ३० नोव्हेंबरला प्रक्षेपित केला जाणार आहे. युरोपच्या स्पेसपोर्ट फ्रेंच गुयाना येथून ५.७ टन वजनाचा हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे. देशातील इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे. दूरसंवाद क्षेत्रात महत्वाचे बदल करण्यासाठी हा उपग्रह मैलाचा दगड ठरणार आहे.

या उपग्रहातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी एप्रिलमध्ये प्रक्षेपित करण्यासाठी फ्रेंच गुयानाला पाठवण्यात आलेला उपग्रह परत माघारी बोलावण्यात आला होता. जीसॅट ६ ए च्या अयशस्वी उड्डाणानंतर इस्रोकडून तांत्रिक त्रुटी दूर करण्यात आल्या. तसेच मोहीम अयशस्वी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली. जीसॅट ६ ए प्रक्षेपित केल्यानंतर दोन दिवसांनी उपग्रहाशी संपर्क तुटल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सांगितले. त्यामुळे जीसॅट ११ मध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आमच्या वैज्ञानिकांशी आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर या उपग्रहाचे ३० नोव्हेंबरला प्रक्षेपण करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती शिवन यांनी दिली आहे.