सामना ऑनलाईन । मुंबई
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र या बंदमधून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि परळीला वगळण्यात आले आहे. या चारही शहरांत केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवेसह शाळा, कॉलेज, दुकाने आणि वाहतूकही सुरू राहणार आहे.
नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळयाला बांगड्यांचा हार
- मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत
- पुणे-बंगळुरू मार्गावरची वाहतूक सुरू
फोटो गॅलरी : पुण्यातील ‘महाराष्ट्र बंद’
- मराठा मोर्चासंबंधी समन्वयकांचा निर्णय, आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे
- १३ ऑगस्टला याचिकेवर होणार सुनावणी
कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौकात मराठा आंदोलन
- सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
- ऍड. आशिष गिरी हे याचिकाकर्त्यांचे वकील
- मराठा मोर्चावर प्रतिबंध घाला,द्वारकानाथ पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका
रत्नागिरीत मराठा आरक्षणासाठी निर्दशने, एसटीच्या अनेक फेर्या रद्द
- खंडूजी बाबा चौकात ठिय्या आंदोलन, खंडूजी बाबा परिसरातील वाहतूक वळवली
- पुण्यातील डेक्कन भागात आंदोलक पुन्हा जमले
मराठा आरक्षण : मेहकरात शिवसेना आमदाराचे मुंडन
- बीड – नाळवंडी नाक्याच्या पुलाजवळ नारळ घेऊन जाणारा ट्रक पेटवून देण्यात आला

- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बंद दरम्यान सेनगाव येथे गोदामाला लावली आग

मराठा आरक्षणासाठी महिलेचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
- नांदेडच्या उमरी येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण
- संतप्त आंदोलकांनी तीन हॉटेलची तोडफोड करत एक पानटपरी जाळली

- आग विझवण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या टॅंकरचीही केली तोडफोड
- उमरी रेल्वे स्थानकात घुसुन केली सामानाची तोडफोड
-
‘महाराष्ट्र बंद’दरम्यान आंदोलकाचा आत्महत्येचा प्रयत्न
- वाळूंज एमआयडीसीबाहेर जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज
- वाळूंज एमआयडीसीमध्ये कंपन्यांमध्ये तोडफोड, पोलिसांचा हवेत गोळीबार
- आंदोलकांनी दोन खासगी वाहनं आणि एक पोलिसांची गाडी पेटवली, वृत्तवाहिनीने दिली माहिती
- संभाजीनगरात महाराष्ट्र बंदला हिंसक वळण
- मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या मारहाणीत जखमी झालेले पत्रकार सुदाम गायकवाड यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र बंद! लातूरमध्ये आमदाराच्या गाडीवर हल्ला व धक्काबुक्की
- पुण्यात महाराष्ट्र बंदला हिंसक वळण
- जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड, चांदणी चौकात तुफान दगडफेक
- हयात हॉटेलमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड
- प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना आंदोलकांची धक्काबुक्की
- पुण्यातील चांदणी चौकात आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, जमावाला पांगविण्यासाठी पोलिंसाचा लाठीचार्ज
- नागपूरमध्ये पालकमंत्री व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आंदोलकांचा घेराव
- हिंगोलीत मराठा आंदोलकांनी जीप पेटवली
- नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनाच्या वेळी गोंधळ
- नाशिकमध्ये मराठा आंदोलकांचे दोन गट भिडले
- लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक, आंदोलकांनी केली धक्काबुक्की
- संभाजीनगर-जालना रेल्वेमार्ग अडवला
- तपोवन एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस आंदोलकांनी थांबविल्या, प्रवाशांचे हाल
भिगवणमध्ये मुंडन करून नोंदवला निषेध
- भिगवण शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढून पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरला
- आंदोलकांनी राज्य शासनाचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या मुंडन केले
मराठा आंदोलनामुळे मराठवाडा रेल्वे सेवा प्रभावित
- मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यातील रेल्वे सेवेवर परिणाम
- देवगडमध्ये जेल भरो आंदोलन
- बंदचा एसटी महामंडळाला फटका, संपूर्ण राज्यातील एसटी सेवा ठप्प. प्रवाशांचे हाल
शाब्बास मराठा! पाहा आंदोलनातील ‘हा’ व्हिडीओ व्हायरल
- बीडमध्ये आंदोलकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
‘महाराष्ट्र बंद’! बीड जिल्ह्यात अभूतपूर्व, ऐतिहासिक, अघोषित संचारबंदी
- मुंबईत काळे कपडे घालून तसेच तोंडावर,डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन
Mumbai: Protesters cover their eyes and mouth with black ribbons during protest demanding #MarathaReservation #Maharashtra pic.twitter.com/Lll8eHn66d
— ANI (@ANI) August 9, 2018
- पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलकांच्या सरकारविरोधी घोषणा
- पुण्यात आंदोलकांना हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड
पंढरपूर कडकडीत बंद, भाविकांचे हाल
- नागपूरात पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले
- नागपूरात बंदला हिंसक वळण, रेलरोकोचा प्रयत्न
- शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे आज विधानमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार होते. पोलिसांनी रोखल्याने त्यांनी विधानभवनाच्या मुख्यदारासमोरच ठिय्या मांडला आहे.
- संभाजीनगरमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात मराठ्यांचे आंदोलन
- पुणे केलक्टर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
- सांगलीतील स्टेशन चौकत आंदोलकांचे ठिय्या आंदोलन
- आमदार अमित देशमुख ठिय्या आंदोलनात सहभागी
- मुंबई पुणे महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प
- नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी एसटी फोडली
- शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे आज विधानमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करणार होते. पोलिसांनी रोखल्याने त्यांनी विधानभवनाच्या मुख्यदारासमोरच ठिय्या मांडला आहे.

- नगर येथील आंदोलनात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले
- मुंबईतील वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांचे आंदोलन
Mumbai: Protesters demanding #MarathaReservation gather outside Mumbai Collector office in Bandra. #Maharashtra pic.twitter.com/Bk0gA6Ltxb
— ANI (@ANI) August 9, 2018
मराठा आंदोलकांनी नगर मनमाड मार्गावर घातली सत्यनारायणाची महापूजा
- पुण्यात लक्ष्मी रोड येथे एसटीवर आंदोलकांची दगडफेक
- नगर मनमाड राज्य मार्गावर सत्यनारायणाची महापूजा, जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले
- सोलापूरमधील माढा येथे आंदोलकांची बाईक रॅली
- संभाजीनगरमधील क्रांती चौकात मराठा आंदोलक रस्त्यावर
शरद पवार यांच्या घरासमोर मराठा समाजाचं ठिय्या आंदोलन
- जळगाव मुक्ताईनगर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन
- अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे सागळुद ते अकोला महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले
- जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कान्हे फाट्याजवळ टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन
- संभाजीनगरमध्ये २५०० पोलीस, ४ एसआरपीच्या तुकड्या, १ रॅपिड अॅक्शन फोर्स, १ पोलीस उपायुक्त, ६ सहाय्यक पोलीस आयुक्त, २५ पोलीस निरीक्षक, १२० पोलीस उपनिरीक्षक आणि ३०० होमगार्ड सुरक्षेसाठी तैनात
- परभणी जिल्ह्यात मानवत येथे रास्ता रोको
- नागपूर मुंबई महामार्गावर आंदोलनामुळे वाहतूकीचा खोळंबा, वाहनांच्या लांबच लांब रांगा
- पुणे सोलापूर महामार्ग आंदोलकांनी रोखला, कोंडी गावाजवळ बैलगाडी, नांगर घेऊन आंदोलक रस्त्यावर
- नगर जिल्ह्यातील पाथर्डीला हायवेवर अग्निशमन दलाच्या गाडीवर दगडफेक
- आंदोलकांनी नगर- मनमाड महामार्ग रोखला
- कोल्हापूरमध्ये कडकडीत बंद, जयसिंगपूर येथे मध्यवर्ती क्रांती चौकात मराठा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन
- बुलडाणा जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद असून शहर व ग्रामीण भागात कडकडीत बंद आहे
- नांदेड वसमत रोडवरील निळा पाटीलजवळ आंदोलकांनी रस्त्यावरील झाड तोडून रास्ता रोको आंदोलन केले
- मराठा आरक्षणासाठी वाशिम जिल्ह्यात १००% टक्के बंद पाळण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला आहे.
Following statewide bandh called by Maratha Kranti Morcha over demand for #MarathaReservation, Buses of Maharashtra State Road Transport Corporation, not plying as a precautionary measure in Pune pic.twitter.com/FDbs4VoCfO
— ANI (@ANI) August 9, 2018
मराठा आंदोलन: बीड जिल्हयात रस्त्यावर सन्नाटा
- राहता महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको
- ससून डॉकमध्ये कडकडीत बंद, मराठा क्रांती मोर्च्याच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
- लासलगाव बाजार समितीत कांदा ,धान्य व भाजीपाल्याचा लिलाव बंद राहणार असल्याने कोट्यावधीची उलाढाल ठप्प होणार
- पुणे जिल्ह्यातील शिरूर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर भागात इंटरनेट सेवा बंद
Internet services have been suspended in 7 tehsils of Pune district- Shirur, Khed, Baramati, Junnar, Maval, Daund and Bhor, as a precautionary measure. #MarathaReservation
— ANI (@ANI) August 9, 2018
- जामखेड शहरातील खर्डा चौकात बैलगाड्यांवर बसून आंदोलनाला सुरवात. तालुक्यात खर्डा, अरणगाव व जामखेड शहरात सकाळी ९ ते ५ सुरु रहाणार चक्काजाम आंदोलन
- नगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज ग्रामदैवत यात्रा असल्यामुळे आंदोलन नाही. मात्र एसटीसेवा बंद
- बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन
- साताऱ्यात कडकडीत बंद, एसटीसेवा, पेट्रोल पंप, दुकाने बंद
- जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील शहापूर येथे महाराष्ट्र बंद दरम्यान जाळपोळ
- संभाजीनगरमध्ये बजाज अॉटो कंपनीच्या बसवर दगडफेक
- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांना सुट्टी
- मराठा आरक्षणासाठी नगर जिल्ह्यातील एसटी बस सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद राहणार
- बंदच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील इंटरनेट सेवा बंद
- मुंबईत जनजीवन सुरळीत
No effect of bandh call yet in Mumbai. Visuals from GTB Nagar. #MarathaReservation pic.twitter.com/wsQ6eWCNOw
— ANI (@ANI) August 9, 2018
- रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा
- लोटे येथील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको
- चिपळूणमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
- दादरमधील फुल व भाजी मार्केट पूर्णपणे बंद
- सिंधुदुर्गातील आठ तालुक्यात जेल भरो आंदोलन, आंदोलक स्वत: पोलीस ठाण्यात जाणार
- सोलापुरात माढा शेटफळ मार्गावर आंदोलकांनी बाभळीची झाडे फेकली, टायर जाळले
- नांदेडमधील मालेगाव येथे टायर जाळून आंदोलकांचा रास्ता रोको
- कोल्हापूरमध्ये एसटी वाहतूक बंद
- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आज दिवसभर बंद राहणार
- मुंबईतील बहुतांश शाळा आज बंद
- लातूरमध्ये आंदोलक आक्रमक, साखरपाटीजवळ टायर पेटवलं
- हिंगोलीमध्ये बंदला हिंसक वळण, सेनगाव येथे अज्ञातांनी पेटवली स्कूल बस


























































