
सामना ऑनलाईन । हैदराबाद
हिंदुस्थानच्या रिटेल सेक्टरमध्ये विदेशी कंपन्यांना शिरण्यास परवानगी दिल्यानंतर स्विडीश ब्रँड असलेल्या ‘आयकिया’ने हैदराबादमध्ये पहिलं आऊटलेट थाटलं. त्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांची झुंबड उडाली. पहिल्या दिवशीच्या ऑफर्स सुटू नये या करता जमलेल्या ग्राहकांची चेंगराचेंगरी झाली. सुदैवानं यात कोणी जखमी झालं नाही.
ऑफर ही ग्राहकांची कमकूवत बाजू आहे. ती लक्षात घेत सर्वच उद्योजक बाजारात आपला जम बसवण्यासाठी ऑफर्सचा भडीमार करतात. हाच प्रत्यय हैदराबादमध्ये आला. आयकियाच्या पहिल्या दिवशीच्या ऑफर्सचा लाभ मिळावा म्हणून हैदराबादकरांनी गर्दी केली होती. या परिसरातील रस्ते गर्दीमुळे ठप्प झाले होते. आयकियाचे कर्मचारी आणि हैदराबादमधील प्रशासकीय कर्मचारी, पोलीस असे सर्व उपस्थित असून देखील गर्दीला आवर घालणं जवळपास अशक्य बनलं होतं. प्रवेशद्वाराजवळतर बॅरिकेट्स लावून ग्राहकांना अडवून धरावं लागत होतं. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सुदैवान कोणीही जखमी झाले नाही.
#WATCH Stampede like situation at public opening of Swedish home furnishing brand #IKEA in Hyderabad, yesterday. pic.twitter.com/Ta5izho02E
— ANI (@ANI) August 10, 2018
दरम्यान, पहिला दिवस असल्यामुळे आम्हा हैदराबादकरांची उत्सुकता प्रचंड होती. इथे वस्तू आणि पदार्थांचे भाव इतर मॉलच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे इथला अनुभव घेण्यासाठीच लोक जमले आहेत, असं एका ग्राहकानं सांगितलं.






















































