अखेर प्रियांका-निकचा साखरपुडा झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
priyanka-and-nick

सामना ऑनलाईन । मुंबई

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि पॉप सिंगर निक जोनास यांचा साखरपुडा शनिवारी पार पडला. साखरपुड्यानिमित्त प्रियांकाच्या जुहू येथील घरी पूजा पार पाडली. या दोघांचा रोको सेरेमनीही मोठ्या थाटात झाला. मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे ऑक्टोबरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी प्रियांकाला सुखी संसारासाठी काही खास टीप्स दिल्या आहेत. साखरपुड्याच्या आधी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते, ‘कोणतेही लग्न हळूहळू मजबूत होते आणि प्रत्येक दिवस आयुष्यातला व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला पाहिजे. कोणत्याही पतीने आपल्या पत्नीच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घेतली पाहिजे. दोघांनी एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र बसून कोणत्याही विषयावर चर्चा करायला हवी.’ शनिवारी पार पडलेल्या प्रियांकाच्या ‘रोको सेरेमनी’त परिणीती चोप्रा, प्रियांकाचा मित्र मुश्ताक शेख आणि सलमानची बहीण अर्पिता खानही उपस्थित होती.