आता नको असलेल्या कॉल्सपासून सुटका होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वेळीअवेळी येणाऱ्या अनावश्यक कॉल्सपासून मोबाईलधारी हैराण होतात. हे कॉल आपल्याला थांबवता येत नाही. त्यामुळे नको तो फोन असे म्हणण्याची वेळ येते. अशा स्थितीत मोबाईलवाल्यांना दिलासा देणारी गोड बातमी टेक महिंद्रा या कंपनीने आज प्रसिद्धपत्राद्वारे दिली आहे. नको असलेल्या कॉल्सपासून मुक्ती देण्यासाठी टेक महिंद्रा कंपनी मायक्रोसॉफ्ट या अमेरिकेच्या कंपनीसोबत काम करणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.

ट्रायच्या नियमानुसार दूरसंचार व्यवस्था सुरळीत करण्यासाठी डिस्ट्रिब्युटेड लेजर टेलॉजीवर (डीएलटी) आधारित पर्याय शोधण्यासाठी टेक महिंद्रा कंपनीने मायक्रोसॉफ्टसोबत हातमिळवणी केली आहे. नको असलेले कॉल्स वा स्पॅम कॉल्स हे देशभरातील दूरसंचार ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ट्राय प्रयत्नशील आहे.

एसएमएसवरही आळा
मार्केटिंग कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना मॅसेज पाठवले जातात. काही मॅसेजमुळे आर्थिक फसवणुकीला तोंड द्यावे लागते. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीच्या प्रकरणात एक प्रबळ हत्यार सिद्ध होईल, अशी आशा टेक महिंद्राचे ग्लोबल प्रॅक्टिस लीडर (ब्लॉकचेन) राजेश धुड्डू यांनी व्यक्त केली.

summary- no more unwanted calls