अखेर चिवला बीच स्मशानभूमीत दिवा पेटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मालवण

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेलेया मालवण मधील चिवला बीच स्मशानभूमीला नगरपरिषदच्या माध्यमातून स्वतंत्र विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. स्वतंत्र वीज जोडणीच्या माध्यमातून स्मशानभूमी प्रकाशमान झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

चिवला बीच स्मशानभूमी परिसरात स्वतंत्र वीज मीटर व्यवस्था होती. मात्र, ती नादुरुस्त असल्याने रात्रीच्या वेळी केवळ स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अंत्यविधी केले जात होते. याबाबत परिसरातील काही जेष्ठ नागरिकांनी नगरसेवक गणेश कुशे यांचे लक्ष वेधले. कुशे यांनी चिवला बीच येथे स्वतंत्र वीज व्यवस्थेबाबत पालिका स्थायी समितीचे लक्ष वेधून पाठपुरावा केला. त्यामुळे स्थायी समितीच्या मंजुरीनंतर येथे स्वतंत्र वीज मीटरच्या माध्यमातून वीज व्यवस्था करण्यात आली आहे.