पदक विजेत्या ब्रिज खेळाडूंना नाही मिळाले ब्लेझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोलकाता

इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानने ब्रिज (पत्ते) खेळात एक सुवर्ण व दोन कास्यपदकांची कमाई केली. मात्र या पदकविजेत्या खेळाडूंना अद्यापही ब्लेझर मिळाले नाही. हिंदुस्थान ऑलिम्पिक महासंघाच्या (आयओए) या सापत्न वागणुकीमुळे पदविजेते खेळाडू नाराज झाले आहेत.

हिंदुस्थान ब्रिज संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक देबाशीष रे म्हणाले, तुम्हाला ब्लेझर मिळणार नाही असे आम्हाला सुरुवातीला सांगण्यात आले होते. मात्र क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर आम्हाला जर्सी देण्यात आली, मात्र अद्याप ब्लेझर मिळालेले नाही. बुधवारी होणाऱ्या अधिकृत कार्यक्रमात जुन्याच ब्लेझरवर ‘आयओए’चा लोगो लावून घेण्याचा आमचा विचार आहे असेही त्यांनी सांगितले.