ममतांचा शिकागोतील कार्यक्रम भाजप-आरएसएसने रोखला, तृणमुलचा मोठा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp-rss-mamata

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे महान तत्त्ववेत्ता संन्यासी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो धर्म परिषदेच्या १२५ वर्ष पूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण केवळ भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या दबावामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा मोठा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तृणमूलच्या या आरोपामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अग्रलेख : हिंदू काँग्रेस

शिकागो येथील विवेकानंद वेदांन्त सोसायटीने स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेतील प्रसिद्ध भाषणाच्या 125 व्या वर्षानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमासाठी ममता बॅनर्जी यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं आणि ते बॅनर्जी यांनी स्वीकारलं देखील होतं. मात्र आयोजकांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला आणि तो कार्यक्रम रद्द करण्यात आला, असं तृणमूल काँग्रेसने म्हंटलं आहे. भाजप-आरएसएसला शिकागोत केवळ एकच मोठा कार्यक्रम व्हावा असं वाटत होतं. तो म्हणजे ग्लोबल हिंदू काँग्रेस (वर्ल्ड हिंदू फाऊंडेशन) ज्याला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार होते. तसे व्हावे म्हणून त्यांनी शिकागोतील विवेकानंद वेदात्न सोसायटीवर प्रचंड दबाव टाकला, अखेर तो कार्यक्रम रद्द करण्यात आला, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, या आरोपवर भाजप आणि आरएसएसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.