चोखंदळ आवड :शाकाहारी संपदाची चटकदार आवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोखंदळ आवड!

शाकाहारी संपदाची चटकदार आवड!

  • ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? : आपण जे खातो तसे आपण बनतो, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे जे पौष्टिक खाऊ तसे आपण सुदृढ, सशक्त बनत जाऊ.
  • खायला काय आवडतं? : शाकाहारी आणि साधं आवडतं. वडापाव , पावभाजी अतिशय आवडीचे.
  • खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता? : हे मला पचेल ना, हे बरं केलंय ना, हे कुठे बनवले असेल अशा शंका मी खाताना घेत नाही. त्यामुळे त्या खाद्यपदार्थांचा त्रास झाला नाही. खूप विश्वासाने खाते.
  • डाएट करता का? : नाही. मोदक आणि पुरणपोळी सोडलं तर गोड आणि अति तळलेलं खात नाही.
  • किती वेळा बाहेर खाता? : महिन्यातून एकदा खाते.
  • कोणत्या हॉटेलमध्ये जाता? : ठाण्याच्या ‘मोहनीज’मध्ये जायला आवडतं.
  • कोणतं पेय आवडतं? : चहा मला अमृततुल्य वाटतो, पण एरवी हॉटेलमध्ये गेल्यावर पिन कोलाडा पिते.
  • प्रयोगावेळी बाहेर असता तेव्हा ? : प्रयोगाच्या वेळी डबा बऱ्याचदा बरोबर असतो. बाहेरगावी प्रयोग असेल तर तिथलं जे साधं अन्न पोळी-भाजी ते खाते.
  • नाटकाच्या दौऱ्यानिमित्त आवडलेला खास पदार्थ? : नाशिकला मी जायचे तेव्हा एक आजी आमच्यासाठी जेवण आणायच्या. त्यांनी आणलेला ठेचा माझा आवडता आहे. कोल्हापूरची भेळ, पुण्याची शेव-बटाटा,पाणीपुरी आवडते.
  • स्ट्रीट फूड आवडतं का? : पाणीपुरी विशेष आवडीची.
  • घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं? : कुळथाचं पिठलं, गरम भात, तूप, त्यावर लसणीची फोडणी,कोशिबिंरअसा बेत असला की, मी खूश.
  • पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता? : सुरळीची वडी हा माझा हमखास ट्रिट देण्याचा पदार्थ आहे. त्यानंतर केळवण, सत्यनारायणाला मेहुण बेलावलं तर काजूचे विडे करते. पान किंवा विडा काजूच्या पेस्टपासून बनवते.
  • उपवास करता का? : नाही, पण खिचडी, दाण्याच्या कुटाची आमटी, वरीचा भात हे पदार्थ आवडतात.

पापड रोल

उडदाचा पापड गॅसवर विशिष्ट पद्धतीने भाजून आइस्क्रिमच्या कोनप्रमाणे त्याची घडी करायची. तो भाजल्यावर लगेच गरम गरम दुमडला की, दुमडतो. मोड आलेली कडधान्य शिजवून घ्यायची. टोमॅटो, कांदा बारीक चिरून घ्यायचा. कोथिंबीर, थोडी, साखर, लिंबू, मीठ आणि चाट मसाला हे सर्व साहित्य एकत्र मिसळायचं. हे मिश्रण या पापडाच्या कोनमध्ये घालायचं आणि सर्व्ह करायचं. असे उडदाच्या पापडाचे कोन करून हवा लागून नरम होऊ नयेत म्हणून पिशवीत घालून ठेवायचे. सर्व्ह करताना अशा पद्धतीने सजवून द्यायचे.