भीषण अपघातात आश्चर्यकारकरित्या तिघे बचावले, पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मदुराई

देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती नुकतीच तमिळनाडूच्या मदुराईत पहायला मिळाली. एका बसने दुचाकीवर स्वार असलेल्या तीन प्रवाशांना उडवले. पण किरकोळ जखम सोडल्यास तिघांना कुठलीच हानी झाली नाही. एवढ्या भीषण अपघातातही हे तिघे वाचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

मदुराई शहरात १६ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला. एका दुचाकीने उजव्या बाजूला वळण घेतले. पण तिथून एक बस त्यांना न दिसल्याने त्यांना जोरदार धडक दिली. बसचालकानेही प्रसंगावधान राखून तत्काळ ब्रेक मारल्याने पुढील अनर्थ टळला. जमा झालेल्या लोकांनी या अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाख केल्यावर त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे कळाले.