
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालूक्यातील समदर्गा येथे ३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कडकडाटासह वीज पडून शेतकऱ्याचा बैल मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे.
३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पासूनच प्रचंड मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन वीज पडल्याने समदर्गा येथील शेतकरी किसन नामदेव काळे यांचा बैल जागीच ठार झाला. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हळदुर्ग शिवारातील किसन काळे यांच्या शेतात तलाठी व पशु वैद्यकीय खात्याच्या संबंधितांनी पंचनामा करुन अहवाल दिला आहे. पशुवैद्यकीय खात्याच्या डॉक्टरांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले आहे.
पंचनाम्यावर योगेश काळे, बालाजी काळे, संजय ढोक, महादेव ढोक, बालाजी कांबळे, अशोक कांबळे, विजयकुमार टिके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शेतकरी नामदेव काळे यांनी तहसिल कार्यालय औसा येथे नुकसान भरपाई मिळावी म्ळणून मागणी केली आहे.
































































