
सामना प्रतिनिधी, मुंबई
दारू आणि चखण्याचे बिल मागितले म्हणून वेटरची हत्या झाल्याची घटना गुरुवारी एल्फिन्स्टन परिसरातील ‘रेड रोज’ या देशी दारूच्या दुकानात घडली. दारुड्याने बर्फ फोडायचा टोचा वेटरच्या पोटात भोसकला. पोलिसांनी आरोपी शैलेश गुप्ता (30) याला अटक केली आहे.
शैलेश हा गुरुवारी ‘रेड रोज’ देशी दारूच्या दुकानात गेला होता. त्याने दारू आणि चखणा मागवला. चखण्यावर ताव मारत दारू ढोसली, पण वेटरने दारू आणि चाखण्याचे बिल मागितल्यावर शैलेशची सटकली. तो इतका संतापला की बर्फ फोडायचा टोचा गणेश जानवलेकर (49) या वेटरच्या पोटात भोसकला. यात गंभीर जखमी झालेल्या गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार कळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शैलेश गुप्ताला अटक केली.
summary- man killed waiter who asked for bill






























































