
>> नरेंद्र चपळगावकर
ज्येष्ठ कथा लेखक तथा अमरावती येथे 1989 साली झालेल्या 62 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राचार्य के.ज.पुरोहित ऊर्फ शांताराम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी कथा समृद्ध करणारा सिद्धहस्त कथा लेखक काळाच्या पडद्याआड गेला आहे. शांताराम यांचा आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचा स्नेह आणि जिव्हाळा होता. अमरावती आणि मुंबईत त्यांच्या भेटी होत, त्यात साहित्यविषयक चर्चा होत असत. सहवासातील या आठवणींना चपळगावकर यांनी उजाळा दिला आहे.
पु. भा.भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर हे मराठी नवकथेचे बिनीचे शिलेदार मानले जातात. मराठी नवकथा ज्यांनी समृद्ध केली, त्यात वरील चौघांव्यतिरिक्त बी. रघुनाथ आणि के.ज.पुरोहित ऊर्फ शांताराम यांच्यासारख्या काहींचा समावेश करायला हवा. अमरावतीला मी शिक्षणासाठी गेलो असताना पुरोहित सरांची ओळख होण्याचा योग आला. ते विदर्भ महाविद्यालयात इंग्रजी शिकवत असत. मी शिवाजी कॉलेजमध्ये असल्यामुळे त्यांचा विद्यार्थी होण्याचे भाग्य मला लाभले नाही, परंतु स्वतः लेखन करणारे अगर वाङ्मयाची आवड असलेले आम्ही काही विद्यार्थी महिन्यातून एकदा तरी पुरोहित सरांना भेटण्यासाठी विदर्भ महाविद्यालयातच असलेल्या त्यांच्या बंगल्यात जात असत. बोलणे मुख्यतः त्यांच्या लेखनाविषयी व मराठी लघुकथेविषयी निघे. तेही आस्थेवाईकपणे आम्हा मुलांच्या वाचनाबद्दल चौकशी करीत असत. मालवणसारख्या काही साहित्य संमेलनात त्यांची पुन्हा भेट झाली. स्वभावातला वैदर्भीय मोकळेपणा आणि विद्यार्थ्यांबद्दल स्नेह नेहमीच कायम होता.
अमरावती येथे 1989 साली झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत ते अवघे एक मत जास्त पडून निवडून आले. ते मत बहुधा तुझेच असावे असे ते गमतीने म्हणाले. नंतरच्या काळात म्हणजे निवृत्तीनंतर ते मुंबईत मुलाजवळ साहित्य सहवासमध्ये राहावयास आले. माझी मुलगी सायली जवळच्याच एका बिल्डिंगमध्ये राहत असल्याने मुंबईस गेलो म्हणजे त्यांची भेट व्हायची. पाच – सात वर्षांपूर्वी साहित्य सहवासच्या जवळच असलेल्या दुकानात किंवा टपरीवर काही वस्तू विकत घेताना दिसायचे. पुढे त्यांना खाली उतरण्याचे श्रमही होईनासे झाले. नंतर त्यांच्या भेटी फक्त घरीच होऊ लागल्या.
आज मराठी लघुकथा दिवसेंदिवस कमी लिहिली जातेय. समाज वास्तवाचे आणि व्यक्ती जीवनाचे आजचे स्वरूप व्यक्त होण्यात हे माध्यम लेखकांना सोयीचे वाटत नसावे. वयाच्या 95 व्या वर्षी अतिशय समाधानाचे जीवन पूर्ण करून गेलेल्या पुरोहित सरांचे जाणे परिचितांच्या प्रमाणे वाङ्मयाविषयी आस्था असणाऱयांनासुद्धा दुःख देणारे आहे.
– ज्येष्ठ साहित्यिक के. ज. पुरोहित पुरोहित यांनी 1989 मध्ये अमराकती येथे झालेल्या 62क्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषकिले होते. तसेच त्यांना सन 2011चा राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा किंदा करंदीकर जीकनगौरक पुरस्कार देऊन गौरकण्यात आले होते. कथाकार म्हणून त्यांचा नाकलौकिक मोठा होता. पुरोहित यांचे पूर्ण नाक केशक जगन्नाथ पुरोहित. त्यांनी ’शांताराम’ या टोपणनाकाने लेखन केले. ते मुळचे नागपूरचे मात्र कर्मभूमी म्हणून त्यांनी मुंबईची निकड केली. नागपूर किद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदक्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी किकिध महाकिद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. जोगेश्वरीच्या ईस्माइल युसूफ महाकिद्यालयात ते प्राचार्य म्हणून कार्यरत होते. जागतिक मराठी साहित्य परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. के. ज. पुरोहित हे शांताराम या टोपणनावाने लेखन करीत. त्यांनी किपुल कथालेखन केले. कथांमधून केगकेगळे किषय हाताळले. त्यांच्या लेखनामध्ये स्थिरता होती. तसेच ते गृहस्थी लेखक म्हणून मानले जायचे. अंधारकाट, आठकणींचा पार, उद्विग्न सरोकर, काय गाककाले, चंद्र माझा सखा, चेटूक, छळ आणि इतर गोष्टी, जमिनीकरची माणसं, ठेकणीतल्या चीजा, धर्म, मनमोर, रेलाँ रेलाँ, लाटा, शांताराम कथा, शिरका, संत्र्यांचा बाग, संध्याराग, साकळाच रंग तुझा, हेल्गेलंडचे चांचे (अनुकाद) आदी पुरोहित यांची साहित्य संपदा आहे.
- शब्दांकन – प्रशांत गौतम





























































