
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी प्रतिनिधी
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्यामार्फत सागरी मासेमारी करणाऱ्या नौकांना मासेमारी नोंदणी प्रमाणपत्र (VRC) दिनांक 20-06-2015 पर्यंत देण्यात आले होते. त्यानंतर सदर कार्यवाही दिनांक 20-06-2015 पासून मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून 4471 नौकाना मासेमारी नोंदणी प्रमाणपत्र (VRC) अदा केले आहे. परंतु त्यापैकी काही नौकानी अद्याप पर्यंत या विभागाकडून महाराष्ट्र मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत नोंदणी अथवा मासेमारी परवाना घेतलेला नाही असे निदर्शनास आले आहे. सबब संबंधीत नौका मालकान्नी तात्काळ संबंधीत परवाना अधिकारी यांच्याकडून या जाहीर निवेदनाच्या दिनान्कापासून 30 दिवसांच्या आत मासेमारी परवाने रितसर घेण्यात यावेत अन्यथा मासेमारी नोंदणी प्रमाणपत्र (VRC) रद्द करण्यात येईल, अशी माहिती रत्नागिरीतील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त आनंद पालव यानी दिली आहे.
या कालावधीनंतर मासेमारी नोंदणी प्रमाणपत्र (VRC) रद्द झाल्यानंतर कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही. तसेच अशा नोंदणी रद्द केलेल्या नौकांची माहिती पोलीस/कस्टम/नेव्ही/कोस्टगार्ड इत्यादी विभागाना देऊन या नौका मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्यावर सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अवैध नौका म्हणून फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल अशीही माहिती आनंद पालव यानी दिली आहे.































































