
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पेट्रोल- डिझेलच्या दरात गेले काही दिवस काहीशी घट होत असताना आता स्वयंपाकाच्या अनुदानित गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अनुदानित स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात प्रतिसिलिंडर 2 रुपये 94 पैशांची वाढ बुधवारी जाहीर करण्यात आली. गॅसच्या आधारभूत किमतीत बदल झाल्याने करपरिणाम म्हणून ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत बुधवार मध्यरात्रीपासून 505.34 रुपये होणार आहे. जून महिन्यापासून गॅस दरामध्ये झालेली ही सलग सातवी वाढ आहे. कारण विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात अनेकदा वाढ झालेली आहे.






















































