नांदेडमध्ये रंगणार निनाद खेळ महोत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नांदेड

भारतीय दंत परिषद शाखा नांदेडच्या वतीने १७ व १८ नोव्हेंबर रोजी राज्यपातळीवरील निनाद खेळ महोत्सव-२०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील जवळपास चारशे ते पाचशे खेळाडू या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

दिवंगत डॉ.निनाद बांसवाडेकर यांच्या स्मरणार्थ या खेळाचे आयोजन कऱण्यात आले आहे. डॉक्टरांनी आपला व्यवसाय सांभाळताना आरोग्याकडे व फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे . असा संदेश देण्यासाठीच या खेळ महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सायंकाळी 7 पर्यंत श्री.गुरुगोविंदसिंघजी इंजिनीयरींग महाविद्यालय विष्णूपुरी, नांदेड आणि स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ,नांदेड येथे वेगवेगळ्या खेळाचे आयोजन केले आहे, त्यात क्रिकेट, बुध्दीबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस असे विविध खेळ खेळले जाणार आहेत.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील क्रिकेटचे संघ यात सहभाग घेणार आहेत. निनाद स्पोर्ट कार्निवलच्या यशस्वीतेसाठी प्रमुख प्रायोजक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडिया यांनी भरीव सहकार्य केले आहे, तसेच अन्य प्रायोजकांनी देखील यास मदत केली आहे.
तरी सर्व क्रीडा रसिकांना व क्रीडा प्रेमींना दिनांक १७ व १८ नोव्हेंबर रोजी एस. सी.जि. एस इंजिनीअरिंग क्रीडांगण व एस. आर.टी. विद्यापीठ क्रीडांगण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय दंत परिषद शाखा नांदेडने केले आहे.