महावितरण कार्यालयावर शिवसेनेचा धडक मोर्चा, शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुरळीत करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shiv-sena-protest-mseb-office

सामना प्रतिनिधी । मुंबई

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महावितरणा विरोधात आक्रमक होत शिवसेनेने शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी आज मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील प्रकाशगड वर धडकले.

वीज असूनही परभणी जिल्ह्यातील 300 हून अधिक ट्रान्सफॉर्मर ना दुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. मोठ्या प्रमाणात भारनियमनाला सामोरे जावे लागते. या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत महावितरणासमोर जोरदार निदर्शने केली. शेतकऱ्यांची कुचेष्ठा करणाऱ्या महावीतरणचा धिक्कार असो… मराठवाड्यावर अन्याय करणारे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुर्दाबद… शिवसेना झिंदाबाद अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. या धडक मोर्चाची प्रशासनाने दखल न घेतल्यास प्रकाशगड समोर उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी वेळी दिला.

electricity-office-protest