
सामना ऑनलाईन । यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. नेर नगरपरिषदेसाठी एकूण 18 जागांवर निवडणुका झाल्या होत्या. यात शिवसेनेनं बाजी मारली असून सर्वाधिक 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेस 4, राष्ट्रवादी 3 आणि अपक्ष 2 जागांवर विजयी झाले आहेत.
नगर महापालिका निवडणूक : शिवसेनेला सर्वाधिक जागा
सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर गुलाल उधळून विजयी उमदेवारांचे अभिनंदन करण्यात आले.
































































