
सामना ऑनलाईन । उदयपूर
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी ही आज आनंद पिरामल सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. ईशाच्या लग्नाच्या विधी गेल्या आठवड्या भरापासून सुरू असून तिच्या संगीतच्या कार्यक्रमात देशविदेशातून कलाकार, नेतेमंडळी, खेळाडू सहभागी झाले होते. या सोहळ्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यातील एका व्हिडीओत अमेरिकेच्या नेत्या व माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन या बॉलीवूड गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत.
John Kerry and Hillary Clinton dancing to Bollywood music with Shah Rukh Khan in India
2018 is weird. pic.twitter.com/tVPcmkqKB2
— Sameera Khan (@SameeraKhan) December 12, 2018
ईशा अंबानीच्या संगीत पार्टीसाठी मुकेश अंबानींनी हिलरी क्लिंटन यांना आमंत्रण दिले होते. त्या या कार्यक्रमासाठी रविवारी उदयपूर येथे दाखल झाल्या होत्या. या कार्यक्रमात संपूर्ण बॉलीवूड सहभागी झाले होते. यावेळी हिलरी देखील ‘तुने मारी एंट्री’या, ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यांवर नाचताना दिसल्या. त्यांच्यासोबत शाहरुख खान, आमीर खान, नीता अंबानी व मुकेश अंबानी देखील नाचत होते. यावेळी अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी देखील नाचताना दिसले.
मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांचे हिलरी क्लिंटन यांचे चांगले संबंध आहेत. हिलरी यांच्या हिलरी फाऊंडेशनला दरवर्षी अंबानींकडून मोठा निधी देखील दिला जातो.

























































