
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
फेसबुकपुढील संकटे कमी होण्याची सध्या तरी चिन्हे नाहीत. या संकटात रोज भरच पडत आहे. इटलीच्या एका नियामक मंडळाने आपल्या वापरकर्त्यांचा डाटा त्याच्या परवानगीशिवाय विकल्याबद्दल फेसबुकला 81 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्याचबरोबर फेसबुकला आपल्या वेबसाईट आणि ऍपवरून वापरकर्त्यांची जाहीर माफी मागण्याचादेखील आदेश दिलेला आहे. इटलीच्या ‘ग्राहक आणि बाजार नियामक मंडळा’ने हा आदेश दिला आहे. फेसबुकने यावर अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण या निकालाची समीक्षा करत असल्याचे सांगितले आहे.




























































