पळसखेडा येथे तरुण शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पहुर

सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावातील २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना दि. २९ डिसेंबर रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सागर संजय सावळे (25) या तरुण शेतकऱ्यावर महाराष्ट्र बँक व फायनान्स बँकचे तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे एकूण तीन लाख रुपयांचे कर्ज होते. दोन वर्षापासुन सततच्या नापीकीमुळे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सागर सावळे होते. यावर्षी सुद्धा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातून पाहीजे त्या प्रमाणात उत्पन्न झाले नाही. त्यामुळे सावळे हे नैराश्यात होते. या नैराश्यापोटी त्यांनी शुक्रवारी स्वतःच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. पहुर ग्रामीण रुग्णालयात सावळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. आज सकाळी मयत सावळे यांच्यावर पळसखेडा गावी अत्यंसस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.