महालक्ष्मी सरस 2019 : 27 राज्यांचा सहभाग, खवय्यांची चांदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी व देशातील विविध राज्यांमधील संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी आयोजित महालक्ष्मी सरस महोत्सव 2019 ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वांद्रे पूर्व येथील एमएमआरडीए मैदानावर हा महोत्सव रंगला आहे. महोत्सवाचे हे यंदाचे 17 वे वर्ष असून 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही या महोत्सवाला भेट देऊ शकता. महोत्सवातील प्रवेश हा विनामुल्य आहे.

23 जानेवारीला राज्याचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यानंतर विविध वस्तू खरेदीसाठी आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खवय्यांची एकच झुंबड उडाली. या वर्षी या महोत्सवात तब्बल 27 राज्यांनी भाग घेतला आहे. याच अर्थ तुम्हाला एकाच वेळी 27 राज्यांच्या कला, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा अनुभव घेता येणार आहे.

देशभरातील विविध आकर्षक वस्तूंचे स्टॉल या ठिकाणी लागले असून मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच खाण्यापिण्याचे असंख्य पदार्थ व संगीताची मेजवानी अनुभवण्यासाठी खवय्ये व रसिकांची रीघ लागली आहे. महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि दादा भुसे यांनीही येथे हजेरी लावली. देशासह विदेशातील पर्यटकही येथे आवर्जुन हजेरी लावत आहेत. तुम्हीही या प्रदर्शनला नक्की भेट द्या.