
सामना प्रतिनिधी । ठाणे/रायगड
हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत थंडीने जोरदार ‘कमबॅक’ केल्याने ठाणेकर व रायगडवासीय पुरते गारठून गेले आहेत. पारा 15 अंशांपर्यंत खाली घसरल्याने नागरिकांनी थंडीच्या बोचऱया वाऱयापासून वाचण्यासाठी दिवसाही स्केटर, शाली गुंडाळल्या होत्या. येत्या काही दिवसांत पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता असल्याने शेकोटीसमोर सर्व सामान्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अचानक सुटलेल्या वाऱयामुळे रायगडात समुद्रात गेलेल्या बोटी किनाऱयावर परतल्या आहेत.
डिसेंबरपासून सुरू झालेला थंडीचा कडाका काही दिवस कमी झाला होता. मात्र गुरुवारपासून अचानक थंड वारे काहू लागले. आज सकाळपासूनच वाहणाऱया शीत वाऱयाने रायगडात वाताकरण गारेगार केले. अचानक सुटलेल्या वाऱयामुळे मच्छीमारांनी बोटी किनाऱयावर नांगरून ठेवल्या, तर काही बोटी किनाऱयावर परत आल्या. ठाण्यातही जोरदार वाऱयाने सतत वावटळ उडत होती. त्यातच विकेंडला जोडून थंडी परतल्याने अनेकांनी कर्जत, मुरबाड, माथेरान येथील फार्म हाऊस व पिकनिक स्पॉटकडे जाण्याचे बेत ठरकले आहेत.































































