‘स्टारडम’च्या मागे धावायचे नाही : स्पर्श शर्माला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई 

अभिनय ही जादू आहे आणि अभिनेता हे त्याचे साधन आहे. अभिनेत्याला या साधनाबद्दलची जाण असणे गरजेचे असते. त्याने त्याच्या संवादाप्रमाणे शरीराल आकार दिला पाहिजे की, जेणेकरून चरित्र जिवंत होईल. हे चरित्र जिवंत करणे म्हणजे काय, हे अभिनेता स्पर्श शर्माला अगदी योग्य पद्धतीने अवगत झाले आहे. ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौलीकडे सहदिग्दर्शक म्हणून काम केलेल्या वीर नारायण यांच्या तीन चित्रपटांची तयारी स्पर्श करत आहे. त्यांतील त्याच्या कामावरूनच त्याची गुणवत्ता लक्षात येणार आहे.

अलीकडे प्रदर्शित झालेला चित्रपट ‘बटालियन 609’मध्ये जस्सीच्या तडफदार व्यक्तिरेखेला स्पर्शने अगदी कुशलतेने साकारले होते. हा चित्रपट त्याने प्रेक्षकांमध्ये बसून पहिला होता, पण जेव्हा त्याच्या मित्रांनी आणि प्रेक्षकांनी त्याला स्पर्शऐवजी  ‘जस्सी’ म्हणून हाक मारली तेव्हा तो क्षण त्याच्यासाठी आश्चर्यचकित करणारा होता. ‘ही व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते. पण मी एक ‘मेथड’ अभिनेता आहे. माझा स्वभाव असा आहे की माझे जे व्यक्तिमत्व आहे त्याच्या अगदी विरोधी भूमिका करायला मला आवडतात. त्यातून आपल्या मेंदूला चालना मिळते, आव्हान मिळते. संवादफेक म्हणजे केवळ अभिनय नव्हे. त्या व्यक्तिरेखेने भावार्थ अचूक अधोरेखित करायला हवा. जस्सीची व्यक्तिरेखा साकारताना तोच भावार्थ मी अचूक पकडला होता.’