पुलवामा दहशतवादी हल्लाप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे एकाला चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
facebook-friend-1

सामना प्रतिनिधी । मालवण

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मालवणमध्ये एकाला चांगलाच चोप देण्यात आला आहे. पुलवामातील घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवत शहीद जवानांना श्रद्धांजली दिली जात आहे. देशात पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, या भ्याड हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला मालवण किनाऱ्यावर चोप देण्यात आल्याची घटना घडली आहे. अखेर आपल्याकडून चुकून पोस्ट फॉरवर्ड झाल्याचे सांगत त्या व्यक्तीने माफी मागितली. या घटनेची किनारपट्टीवर जोरदार चर्चा होती. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली नव्हती.