तुळजापूरजवळ भीषण अपघात; सात ठार, चारजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । तुळजापूर

तुळजापूर घाटाच्या वळणात मळीचा कंटेनर तुळजापूरच्या दिशेने येत होता. त्यावेळी तुळजापूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या अल्टो कारवरते उलटल्याने झालेल्या अपघातात कारमधील सात भाविकांचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता झाला. सोलापूरहून तुळजापूरच्या दिशेने मळी घेऊन येणाऱ्या टँकरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर हा विरूध्द दिशेने येणाऱ्या अल्टो कारवर पलटी उलटला. त्यात कारमधील सात जण जागीच ठार झाले. तर चारजण जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी धाराशिव येथील शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संदिप घुगे, पालिस निरिक्षक तानाजी दराडे, योगेश खटाने, अतुल यादव यांनी भेट दिली.

या अपघातामध्ये रजनी प्रेमकुमार चिलधरे (35), शिवकुमार गोविंद पोवत्ते (40), नर्मदा शिवकुमार पोवत्ते (35) , नेताजी शिवकुमार पोवत्ते (12), श्रध्दा शिवकुमार पोवत्ते (4), अर्पूवा प्रेमकुमार चिलवरे (13), वर्षा लिंबराज अडम (12) या सात जनाचा मुत्यू झाला आहे. तर नागेश कॅनम (32), मयुरी नागेश कॅनम (25), ऋतीका शिवकुमार पोवत्ते (15), श्रावणी भालचंद्र महुत (8) यांना हे जखमी झाले आहेत.