
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला हिंदुस्थानने हवाई हल्ला करत घेतला. या हल्ल्यानंतर आज पाकिस्तानने हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत शिरून बॉम्बफेक केल्याचे वृत्त आहे. यानंतर सीमेच्या दोन्ही बाजूंना तणाव वाढला आहे. हिंदुस्थानने कश्मीरमधील विमानतळांवर अॅलर्ट जारी केला आहे. लेह-जम्मू-श्रीनगर-पठाणकोट मध्ये अॅलर्ट देण्यात आले आहे. या भागातून विमानांचे उड्डाण बंद करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे गृहमंत्रालयात दाखल झाले असून राजनाथ सिंह यांच्यासोबत महत्वाची बैठक सुरू आहे.
दिल्लीत वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत. महत्वाच्या शहरांना अॅलर्टवर ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांना हाय अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानकडून जवळपास 15 भागांमध्ये सतत गोळीबार सुरू ठेवला आहे. हिंदुस्थानप्रमाणे पाकिस्तानने देखील अनेक भागात विमानतळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
Pakistan immediately stops its domestic and international flight operations from Lahore, Multan, Faisalabad, Sialkot and Islamabad airports. pic.twitter.com/nP3rHJr0Ky
— ANI (@ANI) February 27, 2019
यासंदर्भात लाईव्ह अपडेट वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा…
LIVE #WelcomeHomeAbhinandan विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर
वाचा बातमी: युद्ध झालेच तर पाकिस्तानचा पराभव अटळ





























































