
सामना प्रतिनिधी । रांजणी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील नागरिकांची मागील काही दिवसांपासून मराठवाडा एक्स्प्रेस रेल्वे रांजणी येथे थांबवावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांच्याकडे केली होती. खासदार संजय जाधव यांनी यांचा पाठपुरावा करत अखेर रांजणी येथे मराठवाडा एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे. त्यामुळे खासदार संजय जाधव यांचे रांजणीसह परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.
रांजणी परिसरातील २० ते २५ गावे असून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जालना येथे यावे लागते. सकाळी कोणतीच वाहने उपलब्ध नसल्याने शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत होते. याची गरज लक्षात घेता रांजणीसह परिसरातील नागरिकांनी खासदार संजय जाधव यांची भेट घेवून आपली मागणी त्यांच्यासमोर मांडली आणि खासदार संजय जाधव यांनी तात्काळ होकार देत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करुन आज मराठवाडा एक्सप्रेस रांजणी येथे थांबली. या रेल्वेचे खासदार संजय जाधव यांनी नारळ फोडून स्वागत केले.
यावेळी जि.प. सदस्य खालेद कुरेशी, शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव मरकड, शिवसेना विभागप्रमुख रामराव देशमुख, प्रेमसिंग राठोड, सोपान देशमुख, जयराम भाले, राहुल देशमुख, बजरंग व्याकडे, रामनाथ पवार, शिवाजी देशमुख, हरीवंश सुर्यवंशी, मुन्सर अली, ज्ञानेश्वर देशमुख, इलियास अली, महेश कदम, दिलीप माकोडे आदींची उपस्थिती होती.





























































