कामायनी एक्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। इगतपुरी

कामायनी एक्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने मंगळवारी मोठी खळबळ उडाली. इगतपुरी रेल्वे स्थानकावर दोन तासांच्या तपासणीनंतर ही एक्प्रेस पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.

कामायनी एक्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि ही एक्प्रेस इगतपुरी स्थानकात थांबविण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व डब्यांची कसून तपासणी केली, त्यात काहीही आढळून आले नाही. यामुळे ही एक्प्रेस पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.