Video: प्रियंका गांधी मंदिरात पूजा करत असताना लोकांनी दिल्या मोदी मोदीच्या घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मिर्झापूर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पूर्वांचल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मिर्झापूरमधील विंध्यवासिनी मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी पूजा अर्चा व आरती देखील केली. प्रियंका गांधी मंदिरात पूजा करत असताना मंदिराबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी सकाळी प्रियंका सीतामढी मंदिरात गेल्या तिथे पूजा केल्यानंतर त्या विंध्यवासिनी मंदिरात गेल्या. मंदिरात जाण्याआधी त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर विंध्यवासिनी मंदिरात जाऊन त्यांनी देवीची आरती केली. प्रियंका मंदिरात असल्यामुळे काही वेळा साठी सामान्य नागरिकांना दर्शन करण्यापासून रोखले होते. त्या लोकांनी प्रियंका पूजा करत असताना मोदी मोदीच्या घोषणा दिल्या. मंदिरातून निघताना प्रियंका गांधी यांनी मंदिराच्या विझिटर वहीत ‘जय माता दी’ असे लिहले.