अभिनेता प्रकाशराज यांचा बंगळुरूतून उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बंगळुरु

दाक्षिणात्य सिनेमा आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता प्रकाशराज यांनी शुक्रवारी कर्नाटकातील बंगळुरू मध्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खलनायकी भूमिकांतून सिनेरसिकांच्या पसंतीस उतरलेले प्रकाशराज यांनी राजकारणात प्रवेश करून देशसेवा आणि लोकसेवा करण्याचा आपला मनोदय अर्ज भरल्यानंतर बोलताना व्यक्त केला.