Lok Sabha 2019 निवडणूक लढवणार नाही, परंतु मोदींना समर्थन; परेश रावल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
paresh rawal

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अभिनेने आणि भाजप खासदार परेश रावल यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच यापुढेही मोदींचे समर्थन करण्याचे रावल यांनी म्हटले आहे.

परेश रावल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. रावल म्हणाले की, “मी माझ्या माध्यामांतील मित्रांना आवाहन करतो की निवडणुक लढवण्याबाबत कुठलेही अंदाज बांधू नका, मी यापूर्वी पक्षाला सांगितले आहे की मी निवडणूक लढवणार नाही. मी आजही भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि मोदींचा समर्थक राहील.”

2014 साली परेश रावल यांनी अहमदाबाद पूर्वेतून निवडणूक लढवली होती, व जिंकली होती. आतापर्यंत भाजपने लोकसभा उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. त्यात परेश रावल यांचे नाव नव्हते. त्यावरून माध्यमांमध्ये उलट सुटल चर्चा होती. अखेर रावल यांनी यंदा निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.