
सामना ऑनलाईन । पाटणा
विरोधी पक्षांकडून आरक्षणाबात अफवा पसरवल्या जात आहेत असे पंतप्रधान मोदी बिहारच्या एका सभेत म्हणाले. तसेच मोदी असो वा कोणीही असो आरक्षण हटणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मोदी म्हणाले की, “विरोधी पक्ष खोटा प्रचार करत आहेत. आम्ही गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण दिले. आणि आरक्षण कुणीच बंद करणार नाही. स्वतः मोदीही आरक्षण बंद करू शकत नाही.” असे त्यांनी म्हटले.
PM Modi in Jamui, Bihar, earlier today: I want people of Bihar to give a befitting reply to those who are spreading rumours about reservations. Be it Modi or anyone else, no one can remove reservations. pic.twitter.com/LQ9H4w2tYc
— ANI (@ANI) April 2, 2019
काँग्रेसने नेहमीच संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेबांची अवहेलना केली असे मोदी म्हणाले तसेच. त्यांच्या परभवासाठी कट रचले. आजच्या पिढीली हे माहित असले पाहिजे. रालोअच्या सरकारने आंबेडकरांचा सन्मान केला. ज्यांना आंबेडकर श्रद्धास्थानी आहेत ते काँग्रेसला कधीच साथ देऊ शकत नाही असेही मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi in Jamui, Bihar, earlier today: Recall how Congress treated architect of our Constitution, Dr Baba Saheb Ambedkar. Congress plotted many conspiracies to defeat him. It is important that youth of today knows about these facts. pic.twitter.com/QcAAuZa8M7
— ANI (@ANI) April 2, 2019






















































