एका घराण्यासाठी काँग्रेसने डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला : नरेंद्र मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमरोहा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आठवडा शिल्लक असल्याने प्रचाराला वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील अमेराहामध्ये घेतलेल्या सभेत गांधी घराण्यावर हल्ला चढवला. एका घराण्याचे महत्त्व वाढवण्यासाठी काँग्रेसने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप मोदी यांनी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी अथक परिश्रमाने देशाला राज्यघटना दिली आहे. मात्र, काँग्रेसने त्यांचा सन्मान केला नाही. निवडणुकीत डॉ. बाबासाहेब यांचा काँग्रेसनेच पराभव केला. डॉ. बाबासाहेब एका घराण्यासाठी आव्हान होते. त्यामुळे त्या घराण्यातील पुढच्या पिढीनेही बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप मोदी यांनी केला. आज वोटबँकेची गरज म्हणून काँग्रेस बाबासाहेबांचे नाव घेत आहे. अनेक दशके काँग्रेसने बाबासाहेब यांचा फोटो संसदेत लागू दिला नाही, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.