
सामना ऑनलाईन । मंगरुळू
कर्नाटकच्या मंगरुळू शहरात एका सख्ख्या बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला आहे. त्यानंतर एका नातेवाईकानेही तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या आईला जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा तिने पोलिसांत धाव घेत दोघांविरोधा तक्रार केली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना आणि एका नातेवाईकाला अटक केली आहे.
मुलगी आणि आई तिचे नातेवाईक अब्दुलच्या आजारी आईला भेटायला गेले होते. नंतर मुलगी आणि आई दोघे त्या अब्दुलच्या घरी राहिले. रात्री अब्दुलने या मुलीवर बलात्कार केला आणि याची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सकाळी पीडित मुलीने आपल्या आईला सर्व हकीगत सांगितली. आईने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत अब्दुलला अटक केली. तेव्हा ‘पीडित मुलीचा बाप तिच्यावर गेल्या एक वर्षापासून बलात्कार करत होता. तेव्हा आपणही तेच केल्याचे’ त्याने सांगितले. पोलिसांनी मुलीशी विचारपूस केले तेव्हा तिने ही बाब कबुल केली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

























































