प्राथमिक फेरीत अधिकाधिक लढती जिंकण्याचे आमचे ध्येय – रोहित शर्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

आयपीएलचा इतिहास पाहता आमचा मुंबई संघ विजयासाठी ‘स्लो स्टार्टर’ म्हणून ओळखला जातो. पण यंदाच्या आयपीएलमध्ये प्राथमिक फेरीतच अधिकाधिक लढती जिंकून आम्हाला आमच्यावरच तो कलंक पुसून टाकायचा आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने हैदराबाद येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हैदराबादवरील मुंबईच्या विजयाचा शिल्पकार अल्झारी जोसेफच्या विक्रमी कामगिरीवर रोहितने स्तुतिसुमने उधळली. तो म्हणाला, जोसेफचा भन्नाट शो पाहून आमच्या डोळय़ांचे पारणे फिटले. त्याने आम्हाला लसिथ मलिंगाची गैरहजेरी या लढतीत जाणवूच दिली नाही. कायरॉन पोलार्डची 46 धावांची झुंजार खेळीही आमच्या विजयाला मोठा हातभार लावणारी ठरली, असेही रोहितने स्पष्ट केले.