
सामना प्रतिनिधी। मुंबई
कणकवली तालुक्यातील जानवली घरटनवाडी येथील सुभाष नामदेव राणे (वय 63) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातू असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे वृत्तसंपादक रजनीश राणे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
सुभाष राणे यांचा मुक्काम कांजूरमार्ग येथे होता. मनमिळावू स्वभावामुळे ते विभागात सुपरिचित होते. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या पार्थिवावर दुपारी भांडुप येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी समाजातील सर्व स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.




























































