
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाबाबत निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं आहे.
Supreme Court dismisses a plea seeking stay on release of Vivek Oberoi starrer biopic ‘PM Narendra Modi’. The Bench says the film has not yet been issued the certificate by Censor Board. Court says it is to be decided by the EC whether the movie can violate Model Code of Conduct. pic.twitter.com/UA2pU90wfz
— ANI (@ANI) April 9, 2019
पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यावर विरोधी पक्ष काँग्रेसने विरोध दर्शवला होता. मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयानेही चित्रपटाच्या प्रदर्शनास नकार दिला होता. या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे हा चित्रपट आचार संहितेचा भंग करतो की नाही तसेच प्रदर्शनावर निर्णय निवडणूक आयोगाने घेणं योग्य ठरेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.



























































