
सामना प्रतिनिधी । मालवण
एकशे तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या संसदेत बसण्याचा मान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळाला. 25 लाख लोकसंख्या असलेल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारा खासदार म्हणून 5 वर्षे संधी मिळाली. यापुढेही या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी आपले प्रेम असेच कायम ठेवा, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यानी पेंडुर येथे बोलताना केले.
दरम्यान, शिवसेना हे खणखणीत नाणे आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हे नाणे जनतेच्या विश्वासावर खणखणीत वाजेल. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा विचार करता या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने कोकणच्या विकासाचे प्रश्न मांडले. त्या प्रश्नांची सोडवणूक केली, असेही राऊत यावेळी म्हणाले. मालवण तालुक्यातील पेंडुर येथे शिवसेना-भाजप महायुतीची सभा पार पडली. यावेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, भाजपचे संदेश पारकर, उपाध्यक्ष राजु राऊळ, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, शिवसेना श्वेता सावंत, बाळ महाभोज, अण्णा गुराम, श्रीमती वेंगुर्लेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गणेश म्हापणकर, संतोष म्हापणकर, भरत पेंडुरकर, प्रल्हाद म्हापणकर, अभय सावंत यासह अन्य ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश





















































