कश्मीरमध्ये 22 फुटिरतावाद्यांसह 919 जणांची सुरक्षा हटवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यापासून 22 फुटिरतावाद्यांसह 919 जणांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 2700 पोलीस कर्मचाऱ्यांची सुरक्षेच्या ड्युटीतून सुटका झाली असून त्यांना आता सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. तसेच या सुरक्षा हटविल्यामुळे सरकारला त्यांची 389 वाहनं देखील परत मिळाली आहेत.

बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू कश्मीरमधील काही आकडे प्रसिद्ध केले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये 20 जून 2018 रोजी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 22 फुटिरतावाद्यांसह 919 जणांची सुरक्षा काढून घेतली असून आतापर्यंत त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस आता राज्यांची सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी कार्यरत राहतील.