Lok Sabha 2019 मतदानानंतर निवडणूक आयोगाचा अधिकारी बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नादिया

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. मतदानासाठी पश्चिम बंगालमधील रानाघाट मतदारसंघात ड्युटीवर असलेले निवडणूक अधिकारी अर्नब रॉय हे मतदान सुरू असताना अचानक बेपत्ता झाले आहेत.

अर्नब रॉय हे रानाघाट मतदारसंघातील बिप्रादास चौधरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात निवडणूक ड्युटीवर होते. त्यांच्याकडे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची जबाबदारी होती. गुरुवारी त्यांनी सहकाऱ्यांसोबत दुपारचे जेवण केले व त्यानंतर ते बेपत्ता झाले. अर्नब बेपत्ता होऊन तब्बल 24 तास उलटले तरी त्यांचा काहीच पत्ता लागलेला नाही.