
सामना प्रतिनिधी । नगर
नगर येथील पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के (वय 30) यांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्यासह सात जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी (दि.12 मे) रात्री पाईपलाईन रोडवरील संचारनगर परिसरात ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक सुनील त्रिंबके, अमित गाडे व प्रताप गायकवाड यांच्यासह आणखी चार ते पाच जणांनी आमच्या विरोधात केस का केली? अशी विचारणा करत पांडुरंग म्हस्के यांना त्यांच्या घराजवळ तसेच स्वत:च्या ऑफीसमध्ये नेऊन लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नगरसेवक त्रिंबके, अमित गाडे व प्रताप गायकवाडसह आणखी चार ते पाच जणांविरोधात भादवि कलम 323, 367, 143, 147, 149, 323, 504, 506 व 37(1)(3)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

























































