रिक्षा चालकाने पादचाऱ्याचे रॉडने डोके फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

पायाच्या बोटावरुन रिक्षा गेल्याने वैतागलेल्या एका पादचाऱ्याने चालकास जाब विचारला. याचा राग आल्याने चालकाने लोखंडी रॉडने त्या पादचाऱ्याचे डोके फोडल्याची घटना उदगीर येथे घडली.

या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात जहाँगीर इब्राहीम कुरेशी रा. सात सैलानी उदगीर यांनी तक्रार केली. फिर्यादीच्या पायाच्या बोटावर रिक्षा (क्र. एमएच 24 ई 6269) गेल्यामुळे जहाँगीर कुरेशी याने चालक रुपेश राजकुमार शिंदे यास माझ्या पायाच्या बोटावरुन रिक्षा का घातली अशी विचारणा केली. यामुळे चालकाने शिवीगाळ करून कुरेशी याला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर रिक्षामधील लोखंडी रॉड काढून त्याचे डोके फोडले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.