
सामना प्रतिनिधी । लातूर
तालुक्यातील सिंधीकामट येथे शुक्रवारी विवाहसोहळा होता. मात्र लग्नाअगोदर नियोजित वधुने लग्नापुर्वी धुम ठोकली. दरम्यान याबाबत मुलीच्या पित्याने विलास रघुनाथ बनसोडे यांनी सायंकाळी उशिरा मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसाकडुन मिळालेली माहिती अशी की, उदगीर येथील फुलेनगरातील एका मुलीचा विवाहसोहळा देवणी तालुक्यातील सिंधीकामट येथील बालाजी गायकवाड या तरुणाशी ठरला होता. सदरचा विवाहसोहळा शुक्रवारी सिंधीकामट येथे वराच्या घरी होता. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता वधू प्रातविधीसाठी बाहेर गेली ती परत आलीच नाही. सर्वत्र शोध घेतला तरी ती भेटल्याने मुलीच्या पित्याने मुलगी हरवल्याची रीतसर तक्रार देवणी पोलिसात दिल्यावरुन मिसिंग दाखल झाली. मुलगी का पळून गेली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र लग्नाआधीच नववधु पळाल्याने वर्हाड्यांनी अक्षता न टाकताच परतावे लागले. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



























































