
सामना ऑनलाईन । केदारनाथ
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले, रुद्राभिषेक केला. त्यानंतर सुमारे दोन कि.मी. पायी जात ते एका गुहेपर्यंत पोहचले. त्यांच्या हातात काठी होती. पंतप्रधान पवित्र गुहेमध्ये रविवारी सकाळपर्यंत ध्यानधारणा करणार आहेत. त्यानंतर ते बद्रीनाथाचे दर्शन घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले. पारंपरिक गढवाली पोषाख, कमरेला भगवा गमछा आणि पहाडी टोपी परिधान करून पंतप्रधान मोदींनी केदारनाथाचे दर्शन घेतले. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर मोदींनी अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला.






















































