
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
2018 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. परंतु लोकसभेत हे यश राखण्यात काँग्रेसला अपयश आले आहे. तिन्ही राज्यात काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर असून भाजप उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे.
Congress fails to capitalise on assembly poll victories, trails in Rajasthan, MP, Chhattisgarh
Read @ANI Story | https://t.co/AwNNTIzl3T pic.twitter.com/80IufL3k8y
— ANI Digital (@ani_digital) May 23, 2019
मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 25 जागा असून तिथे फक्त 2 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर राजस्थानमध्ये 29 जागा असून इथेही अवघ्या दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशमध्ये भाजप 23 जागांवर तर राजस्थानमध्ये 27 जागांवर भाजप आघाडीवर आहेत. छत्तीसगडमध्येही अकरापैकी 9 जागांवा भाजप आघाडीवर आहे, तर उर्वरित दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगडमध्ये 90 जागांपैकी 68 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले होते. तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बहुमत मिळाले नसले तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. अपक्ष आणि इतर पक्षांच्या मदतीने काँग्रेसने सत्ता स्थापन केली होते.

























































