आता एकच फॉर्म्यूला ‘महायुती’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीचा कौल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाई अध्यक्ष रामदास आठवले, गिरीश महाजन, विनोद तावडे आणि महायुतीच्या नेते मातोश्रीवर पोहोचले. याठिकाणी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन केले, तसचे पेढे खाऊन लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने दिलेल्या कौल साजरा केला. यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे या देखील उपस्थित होत्या.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यंत्री म्हणाले की, मातोश्रीवर येऊन हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेतले. युतीची प्रेरणा तेच होते. आता महायुती ही अभेद्य आहे. येणाऱ्या विधानसभा आणि निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र लढणार, जनतेच्या दरबारात जाऊन काम करणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आता एकच फॉर्म्यूला ‘महायुती’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.