‘गो एअर’चा विमान प्रवास करा 899 रुपयांमध्ये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विमानसेवा पुरवणारी कंपनी गो एअरने आजपासून स्पेशल तिकीट सेलची घोषणा केली आहे. ‘गो एअर मेगा मिलियन’ असे या सेलला नाव देण्यात आले असून यामधून देशांतर्गत प्रवासासाठी अवघा 899 रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. 27 मेपासून तीन दिवस प्रवाशांना या तिकिटाचे बुकिंग करता येणार आहे. 10 लाख तिकिटांची विक्री कंपनीकडून करण्यात येणार आहे. या काळात बुकिंग केलेल्या प्रवाशांना 15 जून ते 31 डिसेंबर या काळात प्रवास करता येईल. याशिवाय, 2 हजार 499 रुपयांपर्यंतचे तिकीट पेटीएमद्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची कॅशबॅक आणि मिंत्रा ऍपद्वारे 1 हजार 999 रुपयांपर्यंतचे तिकीट खरेदी करणाऱयांना 10 टक्के थेट सवलत अशा अनेक ऑफर्स आहेत.